21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

अचानक भेट देऊन केलेल्या कारवाईमुळे फोंडाघाट बाजार मध्ये वाहतूक कोंडी मुक्त रस्ता

फोंडाघाट : वाहतूक कोंडीची समस्या असलेल्या फोंडाघाट बाजारपेठ मध्ये वाहतूक पोलिसांची सरप्राइज व्हीजीट. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई. युवकांमध्ये खळबळ..अनेक जण रस्ता चुकवून आड मार्गाने करताहेत प्रवास.अशीच कार्यवाही सातत्याने होऊन आडमुठ्या वाहन चालकांवर कारवाई व्हावी आणि बाजारपेठेतील रस्ता वाहतूक कोंडी मुक्त व्हावा अशी अपेक्षा पादचारी – आणि पर्याटकांमधून मधून होत आहे. अशा मोहिमांना ग्रामपंचायतीने सुद्धा सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त झाली.

या मोहिमेमध्ये पीएसआय शेगडे, हेड कॉन्स्टेबल विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल घाडीगावकर, प्रकाश गवस, संदेश आबिटकर, आशिष जाधव पोलीस सहभागी झाले होते. मात्र मोहीम पूर्ण करून गाड्या बाजारपेठे बाहेर जाताच. पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे वाहतूक कोंडी पूर्ववत होऊ लागली त्यामुळे आठवड्यातून एकदा अचानक ही मोहीम राबवावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!