26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

कणकवलीतील धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा

कणकवली : सुरक्षिततेचा उपाय म्हणून कणकवली नगर पंचायतीच्या वतीने आपल्या हद्दीतील ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत. तसेच, धोकादायक असलेल्या झाडांच्या मालक व मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे.

तसेच महाराष्ट्र नगरपालिका, नगर पंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम १९६५ चे कलम १९५ (१) अन्वये कणकवली नगर पंचायत हद्दीतील सर्व घरमालकांनाही सूचना दिल्या आहेत. नगरपंचायत हद्दीतील ज्या – मिळकत धारकांच्या घरांचा कोणताही भाग धोकादायक स्थितीत पडावयास झालेला असल्यास अथवा काही भाग अर्धवट पडलेल्या स्थितीत असल्यास तो भाग त्वरित नगर पंचायतीच्या रीतसर पूर्वपरवानगीने काढून टाकावा. मिळकत धारकांनी त्यांच्या जुन्या इमारतीची योग्य त्या सक्षम प्राधिकरणाकडून समक्ष स्थलदर्शक तपासणी करून त्या प्राधिकरणाकडून सुचविण्यात आलेल्या दुरुस्त्या किंवा सुधारणा तत्काळ नगर पंचायतीची

पूर्वपरवानगी घेऊन करून घेण्यात याव्यात. इमारतीच्या पडावयास झालेल्या भागाची किरकोळ दुरुस्ती असेल तर, ती करून घ्यावी. जुने बांधकाम पाडून नवीन बांधकाम करावयाचे झाल्यास तसे विहीत प्रस्ताव नगर पंचायतीकडे दाखल करून रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करावे. आपल्या घरातील तसेच, अन्य रहिवाशांच्या जीविताचे रक्षण करावे. रस्त्याच्या कडेस मोडकळीस आलेली इमारत असल्यास रस्त्याने जाणाऱ्या – येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका पोहोचणार नाही. याची दक्षता घ्यावी व नगरपंचायतीस सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे.

झाडे धोकादायक

शहरातील ज्या इमारती व झाडे धोकादायक झालेल्या आहेत. त्या मिळकतधारकांना नोटिसा नगर पंचायतीने बजाविलेल्या आहेत. त्यांनी नोटीसीनुसार कार्यवाही करून तशी माहिती नगर पंचायतीस द्यावी, अशी सूचना संबंधितांना केली असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!