19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

वागदे-गावठणवाडी येथील विजय लहू गावडे यांचे निधन

कणकवली : वागदे-गावठणवाडी येथील विजय लहू गावडे (५८) यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी २.१० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची खबर विश्वनाथ लहू गावडे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. विजय गावडे सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वागदे ग्रामपंचायत समोरील महामार्ग ओलांडून आपल्या घरी जात असताना चक्कर येऊन खाली पडले होते. त्यांना ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!