26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरत संस्कारक्षम मन जोपासावे :डॉ. प्रसाद देवधर

कळसुली प्रशालेत माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचा स्नेहमेळावा संपन्न

कणकवली | मयुर ठाकूर : विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञानाची कास धरत संस्कारक्षम मन जोपासावे असे प्रतिपादन डॉ. प्रसाद देवधर यांनी केले. कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली व जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्टस्, कळसुली प्रशालेमध्ये आयोजित माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्या स्नेहमेळाव्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कळसुली शिक्षण संघ, मुंबई कार्याध्यक्ष सूर्यकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली हा स्नेहमेळावा पार पडला. या सोहळ्यामध्ये प्रमुख उपस्थितांमध्ये माजी जि.प.अध्यक्ष आर. बी. दळवी ,प्रकाश दळवी ,सत्यवान परब , हनुमंत सावंत , दीपक दळवी ,एम. डी. परब ,जयवंत घाडीगावकर ,श्री.बनसोड, विजय सावंत, के. आर. दळवी,राजहंस दळवी,चंद्रशेखर दळवी ,जय दळवी , महादेव दळवी , विश्वास दळवी, जॉन फर्नांडिस यासोबत अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शुभारंभाला प्रशालेचा नवीन आणि स्तुत्य असा उपक्रम म्हणजेच (आय.बी.टी.) बहुविध कौशल्य अभ्यासक्रम कळसुली शिक्षण संघ, मुंबईने विद्यार्थ्यांसाठी सुरू केला या उपक्रमाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना श्री. बनसोड सरांनी या उपक्रमाचा उद्देश, तंत्रज्ञानाचे वाढतं महत्व स्पष्ट केले. या उपक्रमांतर्गत ऊर्जा आणि पर्यावरण अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान, अभियांत्रिकी तंत्रज्ञान व कार्यशाळा, बांधकाम व शेती तंत्रज्ञान, वेल्डिंग, प्लंबिंग यासारखे विविध कौशल्ययुक्त तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रास्ताविकामध्ये श्री. व्ही. व्ही. वगरे (मुख्याध्यापक इंग्लिश स्कूल, कळसुली) यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती तसेच शाळेतील महत्त्वाच्या घडामोडीची माहिती मेळाव्यामध्ये दिली.

प्रमुख उपस्थितांमध्ये मनोगत व्यक्त करताना चेअरमन स्कूल कमिटीचे के. आर. दळवी यांनी प्रत्येकामध्ये संवाद घडून सुसंवाद घडावा व एकजुटीने इमारत पुनर्बांधणीचे स्वप्न पूर्णत्वास यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासोबतच माजी विद्यार्थ्यांमधून रमाकांत शिवराम दळवी, मोहन विठ्ठल दळवी, भालचंद्र रघुनाथ दळवी, टोनी म्हापसेकर, प्रशांत दळवी,गोविंद वारंग, अरुण दळवी, एस. के. सावंत, विजय विष्णू दळवी, चंद्रकांत देसाई, सौ. ममता सावंत, विजय सावंत ,हनुमंत सावंत आदींनी गतस्मृतींना उजाळा देत प्रशालेतील विविध आठवणी, शिक्षकांचे अनुभव, शाळेमध्ये जगलेले क्षण सर्वांसमोर मांडले.

त्याचबरोबर मान्यवरांमध्ये मनोगत व्यक्त करताना प्रकाश दळवी, आर.बी. दळवी यांनी मल्टी स्किल फाउंडेशन कोर्सला शुभेच्छा दिल्या.डॉक्टर प्रसाद देवधर यांनी इंट्रॅक्टिव्ह स्मार्ट डिजिटल बोर्ड देण्यासाठी रुपये ५० हजार जाहीर केले. अध्यक्षीय भाषणामध्ये सूर्यकांत दळवी यांनी विविध माध्यमातून इमारत पुनर्बांधणीसाठी निधी जमा करणाऱ्या सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना शुभचिंतक, हितचिंतक यांना धन्यवाद दिले. कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे अध्यक्ष पी. एस. दळवी यांनी कार्यक्रमासाठी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशामध्ये इमारत पुनर्बांधणी निधीसाठी मदत करणाऱ्या दात्यांचे आभार व्यक्त केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार माजी विद्यार्थी तसेच प्रशालेतील विद्यमान शिक्षक ए. जी. सावंत यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!