24.7 C
New York
Wednesday, May 22, 2024

Buy now

छत्रपती संभाजी राजे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

कणकवली : छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंती निमित्त माऊली मित्रमंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती संभाजी राजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या हस्ते पुष्पहार, पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांनी असे म्हटले की, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, शिवाजी महाराजांच्या च प्रमाणे त्यांचे शूर, पराक्रमी सुपुत्र यांच्या चरणी प्रत्येक माणूस नतमस्तक होतो, धैर्य, हिंमत, चिकाटी आणि आक्रमक पणा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हि पेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्या ठायी अधिक च होता, अखेर पर्यंत धीरोदत्तपणा कसा असावा हे त्यांनी समस्त मराठा समाजाला घालून दिलेले उत्कृष्ट उदाहरण आहे. यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माऊली मित्र मंडळ, व्यापारी मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, अविनाश गावडे , भगवान कासले , प्रसाद पाताडे, जमिल कुरैशी, लक्ष्मण महाडिक, श्री व सौ बाबुराव घाडिगावकर, हेमंत नाडकर्णी, सचिन कुवळेकर, योगेश पवार, सौ धुरी, मंगेश चव्हाण, ओंकार चव्हाण, प्रकाश चव्हाण, प्रभाकर कदम, पांडुरंग साळुंखे, निलेश निखार्गे आदी उपस्थित होते,

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!