23.2 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

पोईप गावात लोकसभेसाठी ६७.१९ टक्के मतदान

८०१ पैकी ७६४ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क ; शांततेत मतदान प्रक्रिया पडली पार

पोईप |  संजय माने : मालवण तालुक्यातील पोईप गावात एकूण ८०१ पैकी ७६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यामुळे सरासरी मतदान ६७.१९टक्के मतदान झाले .पोईप गावात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न.१ येथे येथील मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली.त्यामध्ये
पुरुष मतदार ५३४ मतदान झाले,स्त्री २३० मतदारांनी मतदान केल्याने एकूण ७६४ मतदान झाले.मतदान प्रक्रिया सुरु असताना चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली होती. पोलिस उपनिरीक्षक श्री. रावसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाची गस्त सुरु होती.

महायुती उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या दोन बाजूला आपले बूथ लावले होते.सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी आप आपल्या मतदारांना बाहेर काढण्यासाठी मेहनत घेतली.आता ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!