13.9 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

मतदान प्रक्रिया संपन्न झाली मात्र पैसे वाटपाची चर्चा जोरच धरू लागली

कोण म्हणतं पाचशेच दिले तर कोण म्हणतं एक हजार दिले

मात्र देतो म्हणून न दिलेल्यांची नाक्या नाक्यावर चर्चा रंगू लागली

सिंधुदुर्ग : निवडणूका म्हटल्या की कोणता ना कोणता राजकीय पक्ष मतदारांना पैसे देण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र आता याच गणितच बदलल आहे. ७ मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान प्रक्रिया पार पडली. अशातच चर्चा होऊ लागली ती पैसे वाटपाची. कोण म्हणतं आम्हाला पाचशे दिले तर कोण म्हणतं आम्हाला एक हजारच दिले त्यात आणखी चर्चेचा विषय म्हणजे कोण म्हणतात आम्हाला भेट वस्तू आता संपली आहे परतच्या फेरी वेळी देतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया संपली आणि मतदारांमधून पैसे वाटपाच्या चर्चेला आणि संबंधित पक्षाच्या पुढाऱ्यांची नाव फोडण्यास सुरुवात झाली.

मात्र नक्की पैसे वाटप करणारा पक्ष आहे तरी कोणता ? याच उत्तर पैसे देण्यासाठी त्या व्यक्ती ज्या मतदारांकडे गेल्या तेच मतदार आज चर्चेत आणत आहेत. मात्र पुढील निवडणुकांवेळी ही थेरी आम्ही लक्षात ठेवू असंही काही मतदार चर्चेत ठेवत आहेत. जिल्ह्यात एका गावात एक नोट असली तर दुसरी नोट नकली असा प्रकार झालाच मात्र संपन्न झालेली निवडणूक प्रक्रिया मात्र पाच वर्षे न विसरता येणार होऊन गेली. त्यात त्या राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली चढाओढ मात्र दिसून आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!