28.5 C
New York
Wednesday, May 22, 2024

Buy now

करुळ चेक नाक्यावर ३० हजारची दारू जप्त

वैभववाडी : करूळ चेक नाक्यावर गोवा बनावटीची ३० हजारची दारू व १५ लाख रुपयाची कार असा १५ लाख ३० हजाराचा मुद्देमाल वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी  इंचलकरंजी येथील गौरव अजित पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई रविवारी सायकांळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी पोलिसांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्वच नाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल सायकांळी करूळ घाटमार्गावरील वाहतुक बंद असताना एक कार करूळ तपासणी नाक्यावर आली. तेथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस  उपनिरीक्षक रोहीत खोत, पोलीस कर्मचारी राहुल तळसकर, सुरज पाटील यांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत एका पिशवीमध्ये गोवा बनावटीच्या २९ बाटल्या आढळुन आल्या. या प्रकरणी पोलीसांनी गाडीमालक गौरव अजित पाटील रा.इचलकरंजी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीसांनी कारसह १५ लाख ३० हजार रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!