19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

वागदे येथील ‘सखी मतदान केंद्र’ ठरले मतदारांचे आकर्षण

कणकवली : लोकसभा मतदारसंघासाठी आज ७ मे रोजी मतदान सुरू आहे. यात कणकवली विधानसभा मतदारसंघातील वागदे केंद्र शाळा क्र.१ येथील सखी मतदान केंद्राने मतदारांचे लक्ष वेधून घेतले होते. येथे करण्यात आलेली तयारी वाखाण्याजोगी होती. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणुकीसाठी कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिलाच होत्या. लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागा संबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र म्हणून याला ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव ठेण्यात आले होते. सखी मतदार केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिलाच होत्या. या मतदान केंद्राला लग्न मंडपासारखे सजविण्यात आले होते. जागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!