24.5 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

‘ए’ यादीतील मतदारांना प्रत्येकी २ हजार रु, ‘बी’ यादीतील मतदारांना १ हजार रु. आणि ‘सी’ यादीतील मतदारांना पाचशे रुपये

भाजपने, ए, बी, सी अशा याद्या करून मतदारांचा ठरविला दर ; दिवसाढवळ्या पैशांचे वाटप

गद्दार आमदार पन्नास खोक्यांसाठी विकले गेलेत पण कोकणची स्वाभिमानी जनता पैशाला कधीच विकली जाणार नाही…!!!

आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला विश्वास

कुडाळ : राणेंना लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाची चाहूल लागल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपकडून निवडणूक काळात पैशांचे वाटप सुरु झालेले आहे. सगळ्या शासकीय यंत्रणा भाजपच्याच ताब्यात असल्यामुळे दिवसाढवळ्या सर्रासपणे मतदारांच्या ए, बी, सी अशा याद्या करून ‘ए’ यादीतील मतदारांना प्रत्येकी दोन हजार रुपये, ‘बी’ यादीतील मतदारांना एक हजार रुपये आणि ‘सी’ यादीतील मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपये अशा दराने पैशांचे वाटप सुरु आहे. भाजपच्या नेत्यांना कोकणातील मतदार बाजारात विकत घ्यायची वस्तू वाटत आहेत का…? कोकणातील जनता भलेही पैशाने गरीब असेल पण विकाऊ नक्कीच नाही. कोकणातील स्वाभिमानी जनतेला विकत घेणारा अजून जन्माला यायचा आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडताना भाजपने पन्नास-पन्नास खोके देऊन चाळीस गद्दार आमदारांना विकत घेत सुरतमार्गे गुवाहाटीला पळवले होते. अशा प्रकारे पन्नास कोटी रुपयांना गद्दार आमदार विकले गेल्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार पडले. आता भाजपचा समोरच्याला विकत घेण्याचा आत्मविश्वास वाढल्यामुळे थेट सरसकट मतदारांनाच विकत घेण्याचा अभूतपूर्व प्रयोग रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात केला जात आहे. कोकणच्या जनतेला विकाऊ समजणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जन्माची अद्दल घडवणे गरजेचे आहे. त्यासाठीच धनशक्तीच्या जोरावर जनशक्तीला पराभूत करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न हाणून पाडायला हवा, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांना केले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत सरासरी ९ लाख एवढे मतदान झाले. आता ९ लाख मतदारांना सरासरी प्रत्येकी एक हजार रुपये वाटायचे झाले तर ९० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातले ठाकरे सरकार पाडताना भाजपने एक-एक आमदार ५०-५० कोटी रुपये देऊन खरेदी केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!