12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

गोवा बनावटीच्या दारुसह ७ लाखाची आलिशान कार जप्त ; कणकवली पोलिसांची कामगिरी

कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुकी धामधूम सुरू असताना कणकवलीत जाणवली येथील हॉटेल निलम कंट्रीसाईड जवळ कणकवली पोलिसांनी एका आलिशान कार ( एमएच ०७ एजी ९६४८ ) वर छापा टाकला.

सदर कार मध्ये ६३ हजार ३६० रुपयांच्या गोवा बनावटीच्या अवैध दारुसह ७ लाखाची आलिशान कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ५ मे २०२४ रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी दत्तप्रसाद नंदकुमार जोईल ( रा. तळेबाजार ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल राहुल राऊत यांनी दिली. त्यानुसार आरोपी दत्तकुमार जोईल विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ ( a ), ६५ (e ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई कणकवली पोलिसांनी केली. तर या कारवाईत कणकवली पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, हवालदार मिलिंद देसाई, पोलीस नाईक विनोद चव्हाण, महिला पोलीस विनया सावंत, चालक मकरंद माने सहभागी होते.

एकूणच जर पाहिलं तर निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली शहरात दारू पकडण्याची ही दुसरी कारवाई असल्याने या कारवाईची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!