मतपेट्या मतदान केंद्रावर नेण्यास सुरुवात ; पोलीस बंदोबस्तही तैनात
कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणूक २०२४ चे मतदान ७ मे रोजी होणार आहे. याचपार्श्वभूमीवर आज मतपेट्या मतदान केंद्रावर नेण्यासाठी एसटी च्या ४७ बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने कणकवली – देवगड – वैभववाडी या तीन तालुक्यात या बसेस त्या त्या प्रभागानुसार मतपेट्या मतदान केंद्रावर नेणार आहेत. यावेळीव सोबत पोलीस पथक, तसेच निवडणूक अधिकारी, कर्मचारी देखील उपस्थित असणार आहेत.
कणकवली कॉलेज कणकवली येथून या एसटीच्या बस गाड्या मतपेट्या घेऊन मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत.