कणकवली : येथील मधलीवाडी येथील राजू भालचंद्र सावंत यांनी आपल्या घराच्या अंगणात लावलेली दुचाकी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजता सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. राजू सावंत यांनी रविवारी रात्री आपली दुचाकी घरासमोरील अंगणात लावली होती. सोमवारी सकाळी राजू सावंत हे अंगणात आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्याने दुचाकीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने अज्ञात व्यक्तीने ती चोरून नेली असल्याचे खात्री झाली. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली. याबाबत तपास कणकवली पोलीस करत आहेत.