22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

केळकर महाविद्यालयाचा दीक्षांत सोहळा उत्साहात

देवगड : श्री. सं. ह. केळकर महाविदयालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील पदवी व पदव्युत्तर वि‌द्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचा दीक्षांत समारंभ मोठया उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व मुंबई विद्यापीठ गीत सादर करून करण्यात आली.

दीक्षांत समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस स्टेशन देवगडचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण भिमराव देवकर साहेब आणि शिक्षण विकास मंडळाचे सन्माननीय पदाधिकाऱी, नियामक समिती सदस्य आवर्जून उपस्थित होते.
उपस्थित स्नातकांना मार्गदर्शन करत असताना श्री. अरुण देवकर यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्व सांगितले. समाजाचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करिअरच्या संधी म्हणून स्पर्धा परिक्षेकडे बघावे. स्पर्धा परिक्षेसाठी खुप मेहनत घेऊन आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करावे. प्रशासकीय सेवेमधुनच देशसेवा आणि समाजसेवा मोठ्याप्रमाणात घडून येते. त्याचबरोबर मिडीयावर फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. फसवणूक कशापध्दतीने होते,यापासून आपण कसे लांब राहीले पाहीजे याचे देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यानंतर शिक्षण विकास मंडळ देवगड चे सदस्य श्री. तुकाराम तेली यांनी करिअर संदर्भात मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मार्गदर्शनानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे, शिक्षण विकास मंडळाचे सन्माननीय पदाधिकाऱी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य आणि उपस्थित प्राध्यापकांकडून पदवीप्राप्त स्नातकांना मुंबई विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

अध्यक्षीय समारोप पर भाषणात महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. विजकुमार कुनुरे यांनी असे प्रतिपादीत केले की, शिक्षण विकास मंडळ ही आपली मातृसंस्था नेहमीच विद्यार्थी केंद्रीत विचार करीत असून विद्यार्थ्यांचे हित साधण्यात धन्यता मानते. त्यामुळेच चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. देवगड महाविद्यालयील विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ही बाब निश्चितच आमच्यासाठी भूषणावह आहे.

सदर दीक्षांत समारंभाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रल्हाद कांबळे, प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत सिरसाठे, प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा.बाळकृष्ण तेऊरवाडकर, आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत राऊत सर यानी केले.

सदर दीक्षांत समारंभास बीए, बी.एस्सी, बीकॉम, एमकॉम, एमएस्सी या शाखेतील पदवीप्राप्त स्नातक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापकांनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन हा दीक्षांत समारंभ यशस्वी केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!