कणकवली : वागदे-टेंबवाडी येथील अशोक लक्ष्मण गोरुले (५७) यांचे सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची खबर संतोष नारायण गोरुले यांनी कणकवली पोलीस ठाण्यात अशोक गोरुले यांचे २५ एप्रिल रोजी हर्नियाचे ऑपरेशन कणकवली उपजिल्हा रुग्णालयात झाले होते. त्यामुळे त्यांना पुढील दोन दिवस रुग्णालयातच अॅडमिट करून २७ एप्रिलला घरी पाठवण्यात आले. त्यादरम्यान २९ एप्रिलला अचानक अशोक गोरूले यांच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात ते दाखल होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अशोक गोरुले यांना मयत घोषित केले.