21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून हिंसंजय राजाराम राऊत यांची खोड -आ. नितेश राणे यांचा घणाघात

कणकवली | मयुर ठाकूर : नरेंद्र मोदी यांची कोल्हापूर मध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा आहे. आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत यांच म्हणणं आहे की, देशाच्या पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान करू नये, छत्रपती घराण्याचा अपमान करू नये, छत्रपतींच्या घराण्याच्या विरोधात प्रचार करायला येणे म्हणजे तो गादीचा अपमान. तर मग संजय राजाराम राऊतला सांगेल तेव्हा हाच नियम हीच भूमिका तुम्ही साताऱ्यामध्ये का घेतली नाही.? तिथे छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत. ती गादी पण आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. तेवढीच मोठी आहे. शिवरायांच्या विरोधात मग तुतारीचा उमेदवार का उभा आहे. मग जो नियम तुम्हाला कोल्हापूरला लावायचा आहे. तोच नियम तुम्ही साताऱ्याला लावा. तिथे तुम्ही गादीचा अपमान करत नाही आहात. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तुमचे शशिकांत शिंदे तुतारी वाजवायला तिथे बसलेले आहेत. स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून… हे जी काय संजय राजाराम राऊतची झालेली सवय ती सवय आता त्यांनी बंद करावी. तुम्ही पहिला साताऱ्याचा उमेदवार थांबवा मग आम्ही विचार करू. आणि देशाचे पंतप्रधान हे उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असताना देशासाठी तरी काय केलं. आणि कोल्हापूरकरांच त्यांच्यावर किती प्रेम आहे. हे पाहायचं असेल तर संजय राजाराम राऊतला गर्दीमध्ये खुर्ची लावून बसवतो. बघा तिकडे आमच्या पंतप्रधान मोदीजींची मॅजिक आणि संजय राजाराम राऊत ने वंशजांचे पुरावे मागितले होते. म्हणून तुझ्या तोंडातून आमच्या छत्रपती घराण्याच्या बाजूने काही ऐकणं हाच मुळामध्ये फार मोठा अपमान आहे. संजय राजाराम राऊत यांनी पहिली माफी मागावी आणि मग छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलावं, अस आ. नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले. यावेळी ते कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पुढे ते म्हणाले, शाहू महाराजांच्या वंशाच्या बद्दल तुम्हाला एवढी चिंता आहे. मग साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत. शिवाजी महाराजांच्या वंशजांत किती गाद्या आहेत. मग तिथे हा नियम काय लावला नाही. तुमचे जे काही शशिकांत शिंदे तुतारीच्या नावाने तिथे उभे आहेत. मग त्या निमित्ताने त्या गाडीचा अपमान होत नाही का ? तुम्ही जय भवानी या शब्दावर एवढा निवडणूक आयोगाबरोबर लढता आहात. मग जय भवानी जय शिवाजी ही जी काय घोषणा आम्ही पिढ्यान पिढी देतोय त्या शिवाजी महाराजांचे वंशज त्याच गादी मधले एक व्यक्ती आज साताऱ्यामध्ये निवडणूक लढवत आहे. मग तिथे तुम्ही त्यांच्या विरोधात प्रचार का करतात. कशी हिम्मत तुमची होते. हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का.? तिथे शरद पवार साहेब विरोधात जाणार नाहीत. तिथे तुमच्या उद्धव ठाकरे जाऊन भाषण करणार नाही. मग कोल्हापूरला एक नियम आणि साताऱ्याला वेगळा नियम असं चालणार नाही.

जनता हेही पाहते की छत्रपती शिवरायांच्या वंशाच्या विरोधात छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी उमेदवार दिलेला आहे. शिवरायांच्या नावावर वर्षानुवर्ष राजकारण करत आले. मग ती साताऱ्याची जागा तुम्ही बिनविरोध का केली नाही. हा प्रश्न आहे. म्हणजे शरद पवार साहेब असतील. उद्धव ठाकरे असतील, आणि तुमचे महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी हे शिवरायांच्या विरोधात आहेत. हा फार मोठा अपमान आहे.

गादीच्या समोर ना उद्धव ठाकरे मोठा आहे, ना पवार साहेबांना मोठे होण्याची त्यांच्या समोर इच्छा आहे. म्हणून गादीचं बोलत असेल अशी तर जेवढी महत्त्वाची आमची कोल्हापूरची गादी आहे तेवढीच महत्त्व एवढी महत्त्वाची आमची सताऱ्याची गादी आहे. म्हणून एका छत्रपतींना एक न्याय आणि दुसऱ्या छत्रपतींना दुसरा न्याय तुम्हाला द्यायचे असेल तर पहिला तुमच सांगा. तुम्ही काय साताऱ्याला करतात. तिथे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात कशाला भाषण करतात. शिवरायांच्या विरोधात भाषण करण्याची तुमची आणि तुमच्या महाविकास आघाडीच्या लोकांची हिंमत कशी होते.असा सवालही पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरेना केला आहे.

गुजरातचा कांदा किती गोड लागतो किती चविष्ट आहे, हे तुझ्या मालकाच्या कुटुंबाला आणि मालकाला विचार. कारण काही आठवड्या अगोदर तुझा मालक आणि त्याच कुटुंब जामनगर मध्ये जाऊन कांदा खाऊन आलेले आहेत. जेवणामध्ये कांदा टाकून चविष्ट जेवण जेवलेले आहेत. अंबानींच्या लग्नाला तेव्हा तुम्हाला गुजरातचा कांदा तुझ्या मालकाला खटकला नाही. म्हणून पहिला गुजरातच्या कांद्याची काय चव आहे, तुझ्या पहिल्या मालकाला विचार आणि मग तुझा थोबाड उघड, असेही आ. नितेश राणेंनी संजय राऊत यांना सुनावले आहे.

शेतकरी हा उद्या हेलिकॉप्टर नेच फिरला पाहिजे. श्रीमंत झाला पाहिजे. याच मानसिकतेच आमच महायुतीच सरकार आहे. तुमच्यासारखं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे लुटणारे नाही. तुम्ही शेतकऱ्यांना बांधावर एवढं एवढे आम्ही देतो ते बोलून फसवणारे तुम्ही म्हणून शेतकऱ्यांच्या बद्दल महाविकास आघाडी आणि तुझ्या मालकाला आणि तुझ्या नेत्याला किती चिंता आहे ना हे उद्धव ठाकरे च्या सरकारच्या काळात आम्हाला दिसलेला आहे. म्हणून शेतकऱ्यांची चिंता तुम्ही करू नका महायुतीच्या आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीपेक्षाही चांगला शेतकरी जगेल टिकेल आणि वाढेल,असेही श्री. राणे यांनी सुनावले.

मग तुझा मालक जे विमान घेऊन फिरतो आणि कर्जतच्या फार्म हाऊस वर ठेवलेला जो काही साठा आहे तो कुठला निवडणुकीसाठी वापरला जातोय. आणि तुमचा जो जाहीरनाम आहे एकाचे दहा सीट उभे आहेत. एकाचे सोळा, एकाचे बाव्वीस सीट उभे आहेत. आणि देशासाठी जाहीरनामा हे लोक देताय. ज्यांचे तीन आकडी पण खासदार उभे नाहीयेत. ते एवढा मोठा देश सांभाळण्यासाठी जाहीरनामा छापताहेत हा फार मोठा विनोद आहे.

काँग्रेस मध्ये अजून खूप फटाके फुटायचे आहेत. दिवाळीच्या अगोदरच काँग्रेसमध्ये एवढे फटाके फुटणारे एवढे रॉकेट उडणार आहेत. ना काँग्रेसला कार्यालयासाठी जागा मुंबईमध्ये राहणार, पुढे काय होतंय म्हणून येतो शुरुवात है काँग्रेस की दुकान बंद होणा बाकी है! असा टोलाही आ. नितेश राणे यांनी लगावला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!