26.4 C
New York
Saturday, September 14, 2024

Buy now

परशुराम उपरकरांचा केसरकरांसह राणेंवर निशाणा | दीपक केसरकर ते आरोप विसरले की त्यांनी ते मान्य केले ?

सावंतवाडी : नारायण राणेंनी तुमच्या वडिलांना “स्मगलर” म्हटले, दुसरीकडे तुम्ही मायनिंगची दलाली करता, असा आरोप केला. हे सर्व काही विसरलात की आरोप मान्य केलात? असा सवाल आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांना केला. दरम्यान आपण स्टार प्रचारक आहोत, असे सांगणारे केसरकर फक्त मतदार संघातच फिरणार आहेत. मग ते स्टार प्रचारक कसे? असा सवाल करीत ते हल्ली पक्षाची भूमिका मांडत नाहीत. त्याचे प्रवक्ते पद काढून घेतले की काय? असा चिमटा उपरकर यांनी काढला. श्री. उपरकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर टिका केली.

ते म्हणाले, या ठिकाणी केसरकर राणेंच्या प्रचारासाठी उतरले आहेत. काही झाले तरी राणेंना मताधिक्य द्या, असे त्यांच्याकडून आवाहन केले जात आहे. परंतू सत्य परिस्थिती ते विसरल्याचे चित्र आहे. त्यांच्या वडीलांना राणेंनी स्मगलरची उपमा दिली होती तर दुसरीकडे केसरकर हे मायनिंगचे दलाल आहेत, असा आरोप केला होता. हे आरोप ते विसरले का? की राणेंनी केलेले आरोप त्यांनी मान्य केले? असा सवाल उपरकर यांनी केला. ते पुढे म्हणाले, या ठिकाणी केसरकर यांनी मतदार संघात फिरण्यासाठी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. आपण जमिनी विकून राजकारण करतो, असे सांगणार्‍या केसरकरांनी आता त्यासाठी पैसे कोठून आणले? ती व्हॅन खरेदी केली का? भाड्याने आणली याची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच एकिकडे मतदार उन्हातान्हातून फिरणार केसरकर मात्र एसीत बसून सभा करणार हे कितपत योग्य आहे. जिल्ह्यात यापुर्वी अनेक नेते झाले. परंतू आज पर्यंत कोणी महागडी व्हॅनिटी व्हॅन प्रचारासाठी आणली नाही, असे सांगून मतदार संघात कुठे ही गेले तरी एका तासात ते आपल्या घरी येवू शकतात. मग व्हॅनिटीची गरज काय? असा सवाल उपरकर यांनी उपस्थित केला.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्व पक्षात फिरलेले आणि अनेक नेत्यांची फसवूणक करणारे केसरकर आता भाजपात जावून चौथी हॅट्रीक करतील, असा टोला यावेळी श्री. उपरकर यांनी लगावला. यावेळी आशिष सुभेदार, मंदार नाईक, नाना सावंत, बाळा बहिरे, आदेश सावंत, विजय जांभळे, धनेश नाईक, चंद्रशेखर उपरकर आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!