कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून मनोज रामचंद्र जाधव (वय ४५, रा. कलमठ नाडकर्णी नगर) याच्याकडून गोवा बनावटीच्या अवैध दारू भरलेली इनोव्हा कार ( एमएच ०७ एजी ३४०० ) जप्त करण्यात आली आहे. २४ हजार रुपयांच्या अवैध दारुसह ६ लाख रुपयांची इनोव्हा कार असा ६ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पीआय तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सागर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार मिलिंद देसाई, कॉन्स्टेबल राहुल राऊत यांच्या पथकाने २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी केली.
आरोपी मनोज जाधव याने सदर इनोव्हा कार मधून गोवा बनावटीची दारू आणल्याची खबर कणकवली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पीएसआय सागर देसाई व सहकाऱ्यांनी तात्काळ कलमठ नाडकर्णी नगर येथे मनोज जाधव च्या घरी जात इनोव्हा कार ची तपासणी केली. इनोव्हा कार मध्ये २४ हजार रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळून आली. हवालदार मिलिंद देसाई यांच्या फिर्यादीनुसार आरोपी मनोज जाधव वर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पीएसआय शिंदे करत आहेत.