21.2 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता

हिंदु जनजागृती समितीचे हेमंत मणेरीकर यांचे प्रतिपादन

हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ ठिकाणी सामूहिक गदापूजन

कुडाळ ( रोहन नाईक ) : आता पुन्हा अयोध्येत ५०० वर्षांनंतर एकदा श्रीरामलला विराजमान झालेले आहेत. अशावेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता आहे. हाच उद्देश ठेऊन आज श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र ‘गदापूजनाचे’ आयोजन केले आहे, असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे हेमंत मणेरीकर यांनी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित गदा पूजन कार्यक्रमात केले.
श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ३३ ठिकाणी ‘गदापूजन’ करण्यात आले. या वेळी शंखनादाने कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्र, श्री हनुमान चालीसा, तसेच ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.

या ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करतांना हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते हेमंत मणेरिकर म्हणाले की, युगानुयुगे मारुतिरायांचे शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाते ती त्यांची ‘गदा’ ! याच दैवी गदेने मारुतिरायांनी अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार करून प्रभु श्रीरामचंद्रांच्या ‘रामराज्या’साठी मोठे योगदान दिले. महाभारताच्या युद्धात देखील अर्जुनाच्या रथावर विराजमान होऊन पांडवांना धर्मयुद्ध जिंकण्यात दैवी सहाय्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठीही समर्थ रामदास स्वामींनी ११ मारूतींची स्थापना करून मावळ्यांकडून बलोपासना करवून घेतली. आता पुन्हा अयोध्येत ५०० वर्षांनंतर एकदा श्रीरामलला विराजमान झालेले आहेत. अशा वेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुतीरायांप्रमाणे भक्तीची अन् शौर्याची आवश्यकता आहे. हाच उद्देश ठेऊन आज श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र ‘गदापूजनाचे’ आयोजन केले आहे. या कार्यक्रमांना संतांची वंदनीय उपस्थिती लाभली, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवावर्ग उपस्थित होता. अशी माहिती हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!