0.7 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

आमदार नितेश राणेंचा कणकवलीत उबाठाला धक्का ; गौरव हर्णे भाजपात दाखल

 नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या नेतृत्वात भाजपात दाखल

कणकवली | मयुर ठाकूर :  भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेला कणकवलीत मोठा धक्का दिला असून शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे अत्यंत निकटवर्तीय तथा युवासेना कणकवली तालुका सरचिटणीस गौरव भानुदास हर्णे यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या नेतृत्वाखाली गौरव हर्णे यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी पं स उपसभापती दिलीप तळेकर, माजी नगरसेवक अभि मुसळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, प्रशांत राणे आदी उपस्थित होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गौरव हर्णे यांनी भाजपात दाखल झाल्यामुळे कणकवली शहरात भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन आज भाजपात प्रवेश केल्याचे गौरव हर्णे म्हणाले. कणकवली शहरातील वॉर्ड नं १२ मध्ये गौरव हर्णे यांचा मोठा जनसंपर्क आहे. गौरव हर्णे यांच्या पक्ष प्रवेशामुळे वॉर्ड नं १२ आता भाजपाचा बालेकिल्ला बनला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!