-1.4 C
New York
Friday, December 5, 2025

Buy now

नरडवे कोकेवाडी येथे ग्रामस्थांचा अभिनव उपक्रम

कणकवली : तालुक्यातील ग्रामपंचायत नरडवे येथील कोकेवाडी नवतरुण मंडळ यांनी श्रमदानातून व लोकोपयोगी भावनेतून पशुपक्षांसाठी भर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची सोय केलेली आहे. त्यासाठी कायमस्वरूपी आरसीसी स्वरूपाची पाण्याची टाकी बस थांबा कोकेवाडी येथे झाडाखाली बांधलेली आहे. याचा उपयोग परिसरातील पशुपक्ष्यांना होत आहे. यासाठी सर्व थरातून समाधान व्यक्त होत आहे.

या लोकोपयोगी कार्यासाठी मंडळाचे सदस्य श्री मंगेश मर्गज, सत्यवान मर्गज, कुमार सतीश मर्गज, श्याम सावंत, शंकर सावंत, राजेंद्र सावंत कुमार ओंकार सावंत, मोहन चव्हाण तसेच सौ सिद्धी सावंत यांनी मोलाचे सहकार्य करून या लोकोपयोगी कार्यासाठी हातभार लावला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!