0.2 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

शेर्पे गावात घरफोडी ८ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास

कणकवली : तालुक्‍यातील शेर्पे मुस्लीमवाडी येथे घरफोडीची घटना घडली. यात ८ हजार ५०० रूपयांची रोख रक्‍कम लंपास झाली आहे. काल २१ एप्रिलला रात्री ८.५० ते ११.५० या दरम्‍यान ही घटना घडली. या चोरी प्रकरणी शरफुद्दीन अब्दूल लतीफ जैतापकर यांनी आज पोलिसांत फिर्याद दिली. शेर्पे मुस्लीमवाडी येथील शरफुद्दीन जैतापकर (वय ५०) हे काल (ता.२१) रात्री साडे आठ वाजता घर बंद करून सर्व कुटुंबियांसह त्‍याच वाडीतील इम्तियाज महंमद यांच्या मुलीच्या हळद कार्यक्रमाला गेले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपून ते रात्री ११.५५ वाजता घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिला. तर किचनमधील फ्रीज वरील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच ओट्यावरही अज्ञाताच्या पायाचे ठसे दिसून आले. दरम्‍यान त्यांनी बेडरूम मध्ये जाऊन पाहिल्‍यानंतर अज्ञाताने कपाट उघडून आतील रोख ८ हजार ५०० रूपयांची रक्‍कम चोरीस गेल्याची बाब लक्षात आली. याप्रकरणी शरफुद्दीन जैतापकर यांनी येथील पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!