बांदा- सावंतवाडी : वडील रागावल्याच्या कारणावरून दोन शाळकरी भाऊ घर सोडून गेल्याची घटना बांदा येथे घडली आहे. याबाबत वडील बाबुराव चौहान यांनी बांदा पोलिसात दोन मुलगे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. सिंगनिया कुमार (१६) व हसमुख कुमार (१४) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाबुराव चौहान यांचे बांदा शहरात चपलाचे दुकान आहे. ते गोव्यातून दुकानात आले असता दोन्ही मुलगे मस्ती करत होती. त्यावेळी वडील रागावले व दोघांना घरी जाण्यास सांगितले. मात्र, एक तासानंतर त्यांची पत्नी घरी गेली असता दोन्ही भावंडे घरी आढळून आले नाहीत. त्यांनी याची कल्पना पतीला दिली.
सोमवारी संपूर्ण दिवसभर त्यांची बांदा शहरात शोधाशोध करण्यात आली. मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे वडिलांनी बांदा पोलिसात बेपत्ताची तक्रार दाखल करण्यात आली. बांदा पोलीस अधिक तपास करीत आहेत. दोन्ही मुले कोणाच्या निदर्शनास आल्यास बांदा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे