मालवण : मालवणच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला यावर्षी दि. २३ एप्रिल रोजी ३५७ व्या वर्षात पदार्पण करत असून यानिमित्त किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्याचा वर्धापन दिन साजरा होणार आहे.
यानिमित्त २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. वायरी येथील मोरयाचा धोंडा येथे श्री मोरेश्वराची पूजा करून त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात सकाळी ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस वंदन करून त्यांना कोल्हापूर येथील शिवप्रेमींतर्फे मर्दानी खेळांची सलामी देण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवर शिवस्तुतीपर विचार मांडणार आहेत. तरी यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन किल्ले प्रेरणोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.