कणकवली : आंब्रड-वरचीवाडी येथील श्री हनुमान भक्तीभवन मंगळवार 23 रोजी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा होणार अाहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम केले अाहे. पहाटे ५.३० वा. जन्मोत्सवावर किरण पारकर यांचे कीर्तन, सकाळी ६.१७ वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, ७ वा. ब्रह्मचैतन्य विघ्नराज, प्रसाद, नवस बोलणे व फेडणे, १०.३० वा. अभिषेक व प्रसाद, विविध कार्यक्रम होणार अाहेत. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.