कणकवली : येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची इलेक्ट्रिकल विभागाची विद्यार्थीनी गौरांगी सावंत व मेकॅनिकल विभागाचे विद्यार्थी सईश वाडकर, आदेश सावंत, दर्शन माटावकर, कार्तिक मोरे, अभिषेक कविटकर यांच्या संशोधनाला यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन कडून पेटंट प्राप्त झाले आहे. त्यानिमित्ताने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
कणकवली अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या संशोधनाची “यूनाइटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटेन” सरकारने दखल घेऊन त्यांना पुढील संशोधनासाठी प्रोत्साहन दिले आहे. या संशोधनाच्या फायद्याने कचरा वेगळे करणे सहजरीत्या शक्य होणार असून त्याचा वापर घरगुती कचरा वेगळा करण्यासाठी होऊ शकेल. सदर पेटंट मेकॅनिकल इंजिनीयरिंग विभागाचे प्राध्यापक कल्पेश सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी करण्यात आले असून त्याला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळणे हि संस्थेसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर व प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमासाठी एस. एस. पी. एम. संस्थेचे संस्थापक केंद्रीय उद्योगमंत्री मा. नारायण राणे, अध्यक्षा सौ. निलमताई राणे, उपाध्यक्ष माजी खासदार निलेश राणे, सचिव आ. नितेश राणे, प्रशासकीय अधिकारी श्री. शांतेश रावराणे, प्राचार्य डॉ. डी . एस. बाडकर , सर्व विभागप्रमुख तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.