कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा कणकवली शहरातील प्रचाराचा शुभारंभ काॅंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल डेगवेकर यांच्या हस्ते श्री देव स्वयंभू मंदिरात येथे श्रीफळ वाढवून झाला. विनायक राऊत पुन्हा एकदा मोठ्या मताधिकाने विजयी होऊ देत. असे साकडे श्री देव स्वयंभू चरणी घातले.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहरप्रमुख रुपेश नार्वेकर, वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, प्रसाद अंधारी,जयेश धुमाळे, तेजस राणे, विलास गुडेकर, सोहम वाळके, निलेश गोवेकर,महेश तेली, वैभव मालंडकर,अजू मोरये, योगेश मुंज, आमडोस्कर, अजित काणेकर, परेश बागवे, आदित्य सापळे आदी मविआचे कार्यकर्ते उपस्थित होते. विनायक राऊत तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिवसेनाचा विजय असो, महाविकास आघाडीचा विजय असो, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.