13.9 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

मुंबई भाजप कार्यालयाला भीषण आग ; वेल्डिंगच काम सुरु असताना आग लागल्याची माहिती

मुंबई : मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत. किचनमध्ये वेल्डिंगच काम सुरु असताना ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

मुंबईतील नरिमन पॉइंट येथे भाजपचे प्रदेशा कार्यालय आहे. येथून राज्यभरातील भाजप संघटनेचे काम पाहिलं जातं. आज कार्यालयात डागडुजीचे काम सुरु होते. यावशी शॉर्टसर्किट होवून आग लागली. या कार्यालयात बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचेही कार्यक्रम होत असतात.

आग लागल्यानंतर धुराचे लोट हवेत पसरत होते. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

आज दुपारी 4.35 च्या सुमारास ही आग लागली. ऑफिसमध्ये कागदपत्रे आणि लाकडी फर्निचर असल्याने आगीने अधिकच पेट घेतला आणि त्यामुळे धुराचे लोटही पसरले. आज रविवार असल्याने कार्यालयाला सुट्टी होती पण या कार्यालयातून सोशल मीडियाचं काम चालतं. त्यामुळे तेवढेच कर्मचारी कार्यालयात होते. आग लागल्यामुळे सर्व कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर पडले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!