22 C
New York
Saturday, July 27, 2024

Buy now

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा कणकवली शहरातील प्रचाराचा आज शुभारंभ !

श्री देव स्वयंभूला भाजपाने कार्यकर्त्यांनी घातले साकडे

कणकवली शहर भाजपच्या वतीने ना. नारायण राणेंना लीड मिळवून देणार

कणकवली : भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कणकवली शहर येथील आराध्य दैवत श्री देव स्वयंभू मंदिरातून करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित कणकवलीचे माजी नगराध्यक्ष श्री समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष श्री बंडू हर्णे, श्री अभिजित मुसळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, श्री किशोर राणे, श्री संजय कामतेकर, श्री अण्णा कोदे, श्री गौतम खुडकर, श्री अभय राणे, श्री महेश सावंत, श्री औदुंबर राणे, सौ मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, राजेश्री धुमाळे आदी उपस्थित होते.

यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा तसेच कणकवली शहरातून राणेंना लीड देण्याबाबतही निर्धार यावेळी करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!