23.2 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

शिवशाही बस मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक | १८हजार ४०० रुपयांची दारू जप्त

वैभववाडी : भुईबावडा तपासणी नाक्यावर शिवशाही बस मधून गोवा बनावटीची १८ हजार ४०० रुपये किंमतीची दारू घेऊन जाणाऱ्या प्रवाशावर वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पार्थ व्हेगडा रा. पोरबंदर गुजरात असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुईबावडा येथे चेक नाक्यावर वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. सध्या करूळ घाटातून वाहतूक सुरु आहे. प्रवासी वाहनातून अवैध दारू वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पो. कॉ. जायभाय, दीपक कानसे भुईबावडा चेक नाक्यावर तपासणी करत असताना शुक्रवारी रात्री १२ वा. सुमारास शिवशाही बस आली. या बसची तापसणी केली असता, पार्थ व्हेगडा रा. पोरबंदर दोन मोठ्या बॅगमध्ये रॉयल स्टॅग कंपनीच्या वीस बॉटल आढळून आल्या. वैभववाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!