21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

गाडीवर झाड कोसळले | सुदैवाने जिवीतहानी टळली

वेंगुर्ले : येथील कुबलवाडा परिसरात उभ्या असलेल्या ईको कार गाडीवर भले मोठे आंबाड्याचे झाड कोसळल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. झाड पडत असल्याचा आवाज आल्याने गाडीतील सर्वजण बाजूला गेल्याने मोठा अनर्थ टळला. वेंगुर्ला कुबलवाडा येथे जयेश गावडे हे आपली गाडी घरासमोर उभी करून उतरत असताना अचानक रस्त्याच्या पलीकडे असलेले भले मोठे आंबाड्याचे झाड मधून तुटून थेट विजेच्या तारा तोडत गाडीवर कोसळले. वेळीच गाडीतील कामगार बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या अपघाताबाबत वेंगुर्ले वीज वितरण कार्यालयाला कळवून विज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर येथील नगर परिषदेला समजतात वेंगुर्ले नगरपरिषदेचे कर्मचारी संतोष जाधव, बाबुराव जाधव, गणेश जाधव, पंकज पाटणकर, किरण जाधव, लक्ष्मण जाधव, शैलेश सातार्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन ते झाड बाजूला करण्यास सुरुवात केली. यावेळी नगर परिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक संगीता कुबल, शिवसेना युवा सेना वेंगुर्ले शहराध्यक्ष संतोष परब उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!