21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

कुत्रा आडवा आला ; अपघात झाला | उपचारापूर्वीच निधन

मालवण : शहरातील स्टेट बँक समोरील रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार अवधूत किशोर निकम (वय- ४५) रा. कुंभारमाठ यांचा मृत्यू झाला. ही घटना १०.४० वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची माहिती अशी कुंभारमाठ येथील अवधूत निकम हे शहरातील आपले काम आटपून दुचाकीने कुंभारमाठ येथे घरी जात असता शहरातील स्टेट बँक समोरील रस्त्यावरअचानक कुत्रा आडवा आल्याने त्याचा अपघात झाला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे दिसताच स्थानिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अवधूत यांच्या अकाली निधनाने शहर, कुंभारमाठ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच ग्रामीण रुग्णालय परिसरात त्यांच्या मित्रपरिवारांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात अपघाताची माहिती घेतली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!