कणकवली ( मयुर ठाकूर ) : केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे लोकसभा निवडणूक उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यावर ना. नारायण राणे यांनी आपल्या मूळ गावी वरवडे येथे जात श्री देव भैरवनाथचे सपत्निक दर्शन घेतले.
यावेळी ते बोलताना म्हणाले, कोणतीही काम यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वप्रथम ग्रामदेवतेचे दर्शन घेतो. कोणतेही काम सुरू करायचे असेल तेव्हा किंवा कोणतीही निवडणूक लढवायची असेल तेव्हा प्रत्येक वेळी येऊन ग्रामदेवतेचे दर्शन घेतो. तसेच रत्नागिरी – सिंधुदुर्ग च्या उमेदवारीवर कोणत्याही प्रकारचा तिढा नव्हता. हा पक्षाचा युक्तिवाद आहे. त्यामुळे जी काय मतदार मागणी होती ती सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आणि मला माहिती होतं की, उमेदवारी मलाच मिळणार, म्हणून मी प्रचार देखील अगोदर सुरू केला होता .
पुढे बोलताना ते म्हणाले, विकास हा मुद्दा… मोदींचा मुद्दा! पहिला चारशे पार करून देशाची आर्थिक प्रगती व्हावी व विकसित देश बनावा, आत्मनिर्भर भारत बनावा आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याचं ना. नारायण राणे म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत सौ. निलमताई राणे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत, शक्ती प्रमुख सदा चव्हाण, युवमोर्चा जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, बूथ प्रमुख आनंद घाडीगांवकर, अशोक राणे आदी उपस्थित होते.