कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी निश्चित केलेली आहे. अडीज लाखांच्या फरकाने आपण निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास ना. नारायण राणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे आभार.! शुक्रवारी सकाळी ११ वाजता ना. नारायण राणे हे आपल्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी रत्नागिरी येथे दाखल होणार आहेत. रत्नागिरी – सिंधुदुर्गच्या लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच नाव घोषित झाल्यावर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणेल, रत्नागिरी – सिंधुदुर्गात सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे. आणि आम्ही निवडणुकी जिंकण्यासाठी लढतोय आणि आम्ही जिंकणार, असा ठाम विश्वास ना. नारायण राणे यांनी व्यक्त केला. तसेच प्रदर्शन करण्याची आम्हाला सवय नाही. आज उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे शुक्रवारी ज्यांना अर्ज भरायचा आहे. हे समजलेले आहे. त्यांची उपस्थिती असणारच आहे,असेही ते म्हणाले.