25.2 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

किरण सामंत यांचे नाव घ्यायची वरून सरदेसाई यांची लायकी नाही

मातोश्रीला खुश करण्यासाठी आगीशी खेळ करू नये – मंगेश गुरव

सिंधुदुर्ग : काल महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना युवा सेनेचे मातोश्री चे तळवे चाटणारे वरून सरदेसाई यांनी रत्नागिरी येथे येवुन जे बरळले त्याच उत्तर जनता त्यांना देईलच. परंतु २०१४ आणि २०१९ या दोन्ही वेळेला मोदींच्या करिष्म्यावर आणि किरण भैया सामंत आणि नामदार उदय सामंत यांच्या मदतीनेच विनायक राउताना संसद सदस्य बनवले हे त्यांनी विसरू नये. ज्या खासदाराला सिंधुदुर्गात रत्नागिरीत साधा एक उद्योग आणता येत नाही, तरुणांच्या हाताना रोजगार देता येत नाही. उलट खंबाटा मध्ये कामगारांचे करोडो रुपये खाऊन अनेकांच्या नोकऱ्या घालवल्या. अशा बिनकामाच्या खासदाराला ह्यावेळी जनता गाडणाराच आहे. मात्र महायुतीच्या नेत्यांवर चिखल फेक करून आपल्या बापाला खुश करण्याचा प्रयत्न करू नये. अशी जोरदार टीका कणकवली शिवसेना उपतालुका प्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना प्रवक्ते मंगेश गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. कोकणात पिकनिक ला आलेले वरून देसाई यांनी कोकण बघून पर्यटन करून जावे. उगाचच आमच्या नेत्यावर टीका करून मातोश्रीला खुश करण्यासाठी आगीशी खेळ करू नये. नाहीतर जशास तसे उत्तर द्यायला वेळ लागणार नाही. असे देखील शेवटी मंगेश गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!