18 C
New York
Saturday, April 26, 2025

Buy now

कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा भाजप पक्षात प्रवेश

कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर यांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र

सलग सातव्या दिवशी ही भाजपा मधे इनकमिंग सुरू

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आज उबाठा सेनेला जय महाराष्ट्र करुन आमदार नितेश राणेंच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नांदगाव विभागात असलेल्या कोळोशी मध्ये उबाठा सेनेला खिंडार पाडले आहे. आमदार नितेश राणेंच्या उपस्थित सलग सातव्या दिवशी ही भाजपा मधे इनकमिंग सुरू असल्याने भाजपा मधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोट्या सावंत, संतोष कानडे,मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, सुशिल इंदप , पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर,छोटू खोत , आयनल माजी सरपंच बापू फाटक, कमलाकर पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!