13 C
New York
Sunday, October 13, 2024

Buy now

भाजपचे संकल्प पत्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरेंटी – आमदार नितेश राणे

कणकवली | मयुर ठाकूर : भारतीय जनता पार्टीचे संकल्प पत्र (जाहीरनामा) म्हणजेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची गॅरेंटी आहे. 2019 मध्ये ज्या पद्धतीने संकल्प पत्रातून जनतेला आश्वासने दिली आणि ती पूर्ण केली त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा 2024 निवडणुकीत दिली जाणारी सर्व आश्वासने येत्या पाच वर्षात पूर्ण केली जातील. देशभरातील 15 लाख जनतेच्या सूचनांवरून हे संकल्प पत्र बनविलेले आहे. यात युवकांच्या कल्याणासाठी, रोजगारासाठी, नोकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक संकल्प करण्यात आलेले आहेत. रेल्वे सारख्या दळणवळणाच्या सेवेत अमलाग्र बदल करून दर्जेदार सेवा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी वचनबद्ध आहे. समान नागरी कायदा, भ्रष्टाचार मुक्त भारत,देवस्थान तीर्थक्षेत्रांचा विकास.पर्यटन विकास,महिलांना पोलीस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष व यंत्रणा असा सर्वांगीण विचार करून हे ७६ पानाचे संकल्प पत्र बनवलेले आहे. अशी माहिती भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कणकवली येथे प्रहार भवन च्या सभागृहात पत्रकार परिषद झाली यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वतीने ही लोकसभा निवडणुकीसाठी संकल्पपत्र जाहीर करण्यात आलेले आहे.त्याबाबतीची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यालयाच्या सूचनेनुसार घेत आहोत.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकर सावंगी आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस संदीप साटम, कणकवली शहर मंडळाचे अध्यक्ष आमचे मिलिंद मेस्त्री,ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष संतोष कानडे,आदी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे म्हणाले,काँग्रेसमुळे जाहीरनाम्यावर किंवा संकल्प पत्र ह्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही.कारण या काँग्रेसने निवडणुकीत कागज का तुकडा असा प्रसिद्ध करायचा आणि नंतर ते विसरून जायचे अशी चुकीची प्रथा आणि पायंडा घातला.मात्र प्रधानमंत्री मोदी यांचे तसे नाही. त्यांनी जी,जी वचने दिली ती पूर्ण केली आहेत.
त्यांनी एकदा ठरवले की ते काम जनतेसाठी होणारच “एक बार मैने कमिटमेंट कियी तो मै अपनी भी नाही सूनता” या डायलॉग प्रमाणे मोदी साहेबांचे काम आहे.भाजपचे संकल्प पत्र म्हणजे मोदीजी ची गॅरंटी आहे.ही देशातील एकमेव गॅरंटी आहे जी बंदुकीच्या गोळीसारखी आहे.
मोदींजीच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या न सुटणारे विषय मार्गी लागले आहेत.३७० कलम आठवले देशभर एकच कायदा लागू केला. राम मंदिर निर्माण केले. देश भ्रष्टाचार मुक्त करण्याचे काम सुरू केले. भारताला विकसित देश बनविण्यासाठी जे विकास काम करणे आवश्यक आहेत ते संकल्प पत्र भाजपने जाहीर केलेले आहे. यात नारी शक्तीला सक्षम करण्यासाठी आमच्या सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.

कोकणातील धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण “प्रसाद” नावाच्या योजनेतून करण्यात येणार आहेत. पुरातत्व विभागाचा विस्तार होणार आहे.

काँग्रेस च्या काळात आपला देश भ्रष्टाचारी देश म्हणून ओळखला जात होता मात्र आमच्या सरकारने भ्रष्टाचार मुक्त देश करण्याचे काम सुरू केले आहे. समान नागरी कायदयाचा उल्लेख आमच्या संकल्प पत्रात केलेला.आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या पाकिस्तान,चीन यांच्या समोर काँग्रेस लोटांगण घातलं होत.आज मोदींचे नाव एकूण देशासमोर हे लोक लोटांगण घालत आहेत.काँग्रेस सरकार आणि अतिरेकी कारवाया हे समीकरण झालेले होते आता देशाकडे वाकड्या नजरेेने पाहण्याची हिम्मत अतिरेक्यांची कोणाची होत नाही. त्यामुळे देशात अतिरेक्यांच्या कारवायात थांबलेले आहेत. ८० कोटी जनतेला मोफत धान्य देणे मोदी सरकार ची गॅरेंटी आहे यापूर्वी दिले आणि पुढेही पाच वर्ष हे मोफत धान्य दिले जाणार आहे. सरकारी भरती देखील मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे.असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले. देशात,राज्यात किंवा जील्हात ईद किंवा इतर सन उत्सवाला हिंदू धर्मियांनी विरोध केला नाही. सर्वत्र शांततेत सन पार पडला. जो नियम अन्य धर्मियांच्या सणाला असतो तोच नियम राम जन्म सोहळ्याला लावावा.असे आमदार नितेश राणे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

ज्या माणसाने १० वर्षात काहीही विकास केला नाही. ६ वर्षे सत्तेत राहिला मात्र काम काही केले नाही त्या विनायक राऊत ला पराभव कोणाचा होतो, वाकोल्याच तिकीट नेमकं कोणाला मिळत हे लवकरच समजेल.अशी टीका केली.
ज्या राऊत च कुटुंब खिचडी प्रकरणात बरबटलेले आहे. स्वतः पत्राचाळ घोटाळ्यात १०० दिवस जेल मध्ये होता. त्याने दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नये.पंतप्रधानांवर एक आरोप कोणी करू शकत नाही आणि ज्यांच खाण पिन भ्रष्टाचारातून होत त्यांनी भांडुप मध्ये राहून टीका करू नये असा टोला संजय राऊत यांना लगावला. मोदींजींनी काय केलं हे कॅरॅक्टर लेस माणसाने टीका करू नये. त्यासाठी पाकिस्तानात जावं आणि मोदींची ५६ इंच छाती आहे आणि पाकिस्तानी मोदींना किती घाबरतात ते पाहावं. गृहमंत्री २४ एप्रिल ला रत्नागिरीत येत आहेत. महायुतीच्या उमेदवाराला निवडून देऊ असे निश्चित पणे सांगू आणि मोठ्या ताकतीने रत्नागिरीला जाऊन त्यांना तो विश्वास देणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!