सिंधुदुर्गातील बेधडक नेतृत्व
विधानपरिषद निवडणूकीत शेवटच्या क्षणी तिकीट कापल्याने नाराज होऊन परशुराम उपरकर यांनी २०१२ साली शिवसेना सोडली. राजकारणात जर-तरला काहीच अर्थ नसतो. तरी सुद्धा काही गोष्टी काळाच्या पटलावर जर तरच्याच कसोटीवर पडताळून पाहाव्या लागतात. जर त्यांनी शिवसेना सोडली नसती तर दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत हे विधानपरिषदेत आमदार असल्याने रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळाली असती.
२०१४ साली मोदी लाटेत शिवसेनेचे जे १८ खासदार निवडून आले, त्यात त्यांचासुद्धा निश्चितपणे समावेश झाला असता. २०१९ साली रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात समोर अपक्ष उमेदवार उभा असल्यामुळे ते पुन्हा एकदा निर्विवादपणे खासदार बनले असते. अशा प्रकारे शिवसेना सोडल्यामुळे त्यांनी दोन टर्म लोकसभेची खासदारकी गमावली, शिवसेना या चार अक्षरांसाठी घरा दारावर तुळशीप्छ ठेवून काहीही करण्याची तयारी असलेली शिवसैनिकांची फळी शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झाली होती. परशुराम उपरकर हे त्याच फळीतील एक नाव आहे.९० च्या दशकात जनता दल आणि काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा झेंडा खांद्यावर घेऊन जीजी उपरकर नावाचा तरुण शिवसेनेची पाळेमुळे सिंधुदुर्गात रुजवू पाहत होता. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून १९८३ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘भगवा सप्ताह’ आयोजित करण्यात आले.
१९८८ साली कणकवली ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक लागली. परशुराम उपरकरांनी ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एरव्ही काँग्रेस व जनता दल पक्षाचे जिल्ह्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात विळी-भोपळ्याचे वैर होते; परंतु सिंधुदुर्गात पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही निवडणुकीत शिवसेना पक्षाला मिळालेला हा पहिला विजय होता. त्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना फोफावण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करत सर्वांत जास्त त्याग कोणी केला असेल, पक्षासाठी विरोधकांचे वार अंगावर होलून पक्षाला संजीवनी देण्यासाठी झटलेले नाव फक्त परशुराम उपरकरच…! नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी कोणीच तयार नव्हते. त्यावेळी परशुराम उपस्कर शड्डू ठोकत मैदानात उत्तरले.
कणकवली- मालवण विधानसभा पोटनिवडणुकीसाठी परशुराम उपरकरांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली आणि संघटनेच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी शिवसेनाप्रमुखांसह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच मालवणच्या जाहीर सभेत कोकणी जनतेसमोर नतमस्तक झाले. निवडणूक निकालाअंती परशुराम उपरकरांचा पराभव झाला असला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व त्यांनी विरोधकांना दाखवून दिले, परशुराम उपरकर यांनी पोटनिवडणुकीदरम्यान दाखवलेल्या लहवय्येपणाचा यथोचित सन्मान म्हणून शिवसेनाप्रमुखांनी त्यांना विधानपरिषदेत आमदारकीची बक्षिसी दिली. आमदारकीच्या कार्यकाळात त्यांच्यामध्ये इतकी वर्षे दडून राहिलेल्या अभ्यासू नेत्याची हालक जिल्हावासीयांना अनुभवायला मिळाली.