15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत अभिजित गुरव यांची बैलगाडी प्रथम

जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत चंद्रकांत सावंत यांची बैलगाडी प्रथम

दामू सावंत मित्रमंडळ जानवलीचे आयोजन

कणकवली | मयुर ठाकूर : हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी बैलगाडी शर्यंत जानवली येथे संपन्न झाली. जानवली येथील दामू सावंत मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत एकूण ४५ बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक, ढाल, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत गावठी गटात तुषार सुरेंद्र कुडतरकर १ मिनिट ७ सेकंद ५७ पॉईंट गाठून प्रथम क्रमांक पटकावला, समीर जगन्नाथ मयेकर याने १ मिनिट ११ सेकंद ५० पॉईंट गाठून द्वितीय क्रमांक, गांगेश्वर रवळनाथ शिडवणे यांनी १ मिनिट १४ सेकंद ३८ पॉईंट गाठून तृतीय तर विनय सुभाष जाधव १ मिनिट ४७ सेकंद ७८ पॉईंट गाठून चौथा क्रमांक मिळवला आहे.

जिल्हास्तरीय स्पर्धेत चंद्रकांत सावंत यांनी ०० मिनिटे ५१ सेकंद ४१ पॉईंट गाठत प्रथम क्रमांक पटकावला, प्रशांत अपराज यांनी ०० मिनिटे ५१ सेकंद ८१ पॉईंट गाठत द्वितीय तर अमोल ठाकूर यांनी ०० मिनिटे ५३ सेकंद ७८ पॉईंट गाठत तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धेत अभिजित गुरव यांनी ०० मिनिटे ४९ सेकंद ३८ पॉईंट गाठत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आई महालक्ष्मी उन्हाळे यांनी ०० मिनिटे ५० सेकंद १८ पॉईंट गाठत द्वितीय तर रमेश पावसकर यांनी ०० मिनिटे ५१ सेकंद २५ पॉईंट गाठत तृतीय क्रमांक पटकावला आहे. दरम्यान यावेळी अनिल राणे यांना उत्कृष्ट बैल जोडी व राजू पाटणकर याना उत्कृष्ट जॅकी असे पारितोषिक देण्यात आले.

यावेळी शिवसेना समन्वयक सुनील पारकर, शेखर राणे उपजिल्हाप्रमुख, महेंद्र सावंत उपजिल्हाप्रमुख, संदीप सावंत उपतालुकप्रमुख भाजप, संजय पवार – महिला बाल विकास वरिष्ठ लिपिक, पत्रकार नंदू सावंत, सरपंच अजित पवार, ओंकार पांगे, कुशल राणे, आशिष राणे, उपसरपंच किशोर राणे, संतोश राणे, उदय राणे बुवा, दीपक दळवी, हळवल चे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मारुती सावंत, परेश सावंत, प्राजक्ता राणे, दर्शन सावंत, चैतन्य राणे, प्रशांत राणे, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.

तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन : आयोजक दामू सावंत

बैलगाडी शर्यतीचे हे तिसरे वर्ष आहे. बैल सध्या लुप्त होत चालले आहेत. गोधन नेमकं काय आहे याची पूर्णपणे तरुण पिढीला माहिती मिळावी, तरुण पिढीला आवड निर्माण व्हावी. या क्षेत्रात एक उत्कृष्ट गाय – बैल च उत्पन्न व्हावं. तरुण पिढीला यातून प्रेरणा मिळावी. तसेच तरुण शेतकऱ्यांना व युवा वर्ग बैलगाडी शर्यत स्पर्धेत उतरावेत, हेच बैलगाडी शर्यत आयोजित करण्यामागचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख दामू सावंत यांनी केले. यावेळी ते दामू सावंत मित्र मंडळ आयोजित बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या वेळी बोलत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!