15 C
New York
Wednesday, April 23, 2025

Buy now

सावडाव येथील मारहाण प्रकरणी ठाकरे शिवसेना आक्रमक ; पोलिसांना विचारला जाब

अन्यथा पोलीस स्टेशन विरोधातच बॅनर लावण्याचा इशारा

संशयितांच्या अटकेची मागणी

कणकवली : सावडाव येथे रस्ता प्रश्नातून एका महिलेला केलेली मारहाण हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. मारहाण करणारे बिनधास्तपणे वावरत आहेत त्यांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही. विनयभंग सारखा प्रकार होऊनही याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही, हे दुदैव आहे. उलट पोलिस स्टेशनवर आलेल्या आरोपींना परस्पर विरोधी तक्रार करता यावी यासाठी हॉस्पिटलला पाठविल्याचा आरोप उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रकरणी शिवसेना आंदोलनात्मक भूमिका घेईलच परंतु पोलीस यंत्रणेकडून न्याय न मिळाल्यास असे प्रकार घडल्यास पोलीस स्टेशनवर जाऊ नये, असे प्रतिकात्मक बॅनर लावण्यात येतील
असा इशारा ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिला.

सावडाव येथे रस्ता प्रकरणावरून घडलेल्या मारहाणप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडीप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेतली. यावेळी तालुका प्रमुख कन्हैया पारकर, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, धीरज मेस्त्री, राजू राठोड यांच्यासह सावडाव ग्रामस्थ उपस्थित होते.

सावडाव स्मशान भूमिकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून प्रमोद नरसाळे, वैभव सावंत व नयना सावंत यांना रविवारी सायंकाळी मारहाण करण्यात आली. विनयभंग करण्यात आला असल्याचा संशय आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही, हे दुदैव आहे. उलट पोलिस स्टेशनवर आलेल्या आरोपींना परस्पर विरोधी तक्रार करता यावी यासाठी हॉस्पिटलला पाठविल्याचा आरोप उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच सदर प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरावे, लागेल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याशी बोलताना माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, प्रमोद नरसाळे यांची सावडाव स्मशान भूमीकडे रस्त्यावर जमीन आहे. त्या जमिनीत जेसीबीने खोदकाम करत असताना दत्ता काटे व अन्य व्यक्तींनी त्यांना खोदकाम करण्यास अटकाव केला तसेच मारहाण केली. त्यावेळी तेथे गेलेले सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत व नयना सावंत यांनाही गंभीर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे.
संशयित दत्ता काटे व त्याचे अन्य सहकारी यांनी वैभव सावंत व त्यांची पत्नी नयना सावंत यांना अमानुषपणे मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
त्यात विनयभंगाचाही प्रकार घडला असतानाही पोलीस संशयीतांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. ज्यावेळी संशयित पोलीस ठाण्यात आले होते त्यावेळी ते नशेत असल्याचे सीटीटीव्हीमध्ये दिसत असल्याचा आरोप युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला.

पोलिसांनी संबंधित संशयितांना कणकवली उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी दाखल व्हा असे सांगितले. परंतु ते संशयित त्यावेळी पोलीस ठाणे आवारात काहीही लागले नसल्यासारखे फिरत होते. फक्त परस्परविरोधी तक्रार दाखल व्हावी या उद्देशाने हे केले असल्याचे स्पष्ट होत आहे असल्याचे सतीश सावंत व सुशांत नाईक यांनी सांगितले.

एखाद्या महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग होत असूनही संबंधितांवर अद्यापही कोणतीही कारवाई होत नाही ही बाब अतिशय दुर्दैवी असल्याचे सतीश सावंत यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री व पोलीस अधीक्षक कायदा, सुव्यवस्था राखली पाहिजे असे सांगत असताना आम्ही त्यांचे पालन करत आहोत. मात्र विनयभंग होऊनही संशयित पोलीस स्टेशन आवारातच बिनधास्त फिरत होते हे लज्जास्पद असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले. तर मारहाणीच्या प्रकाराचे शुटींग करणाऱ्या वैभव सावंत यांच्या मुलाचा मोबाईल काढून घेण्यात आला. तसेच मंगळसुत्रही चोरी करण्यात आलेले होते, ते नंतर पोलिसांकडून मिळाले असल्याचे यावेळी ठाकरे शिवसेनेच्यावतीने सांगण्यात आले. पोलीस स्टेशनवर याबाबत न्याय न मिळाल्यास असे प्रकार घडल्यास पोलीस स्टेशनवर जाऊ नये, असे बॅनर लावण्यात येतील. तसेच याप्रकरणी नयना सावंत महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याचे श्री. सतीश सावंत म्हणाले.

दरम्यान, ज्या जागेचा वाद आहे, ती जागा खासगी मालकीची आहे. तेथे यापुर्वी लावलेली काजू कलमे काढून टाकण्यात आली. गडगा पाडण्यात आला. आता जेसीबीने चर मारत असताना ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप जमिन मालक नरसाळे कुटुंबियांनी यावेळी केला. मारहाण झालेल्या महिलांनी आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली.

ठाकरे शिवसेनेच्यावतीने यावेळी भूमिका स्पष्ट करताना महिलांना जर अशा प्रकारे मारहाण होत असेल तर पक्ष न पाहता आम्ही ठामपणे या लोकांच्या मागे उभे राहू असे सांगण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!