फोंडाघाट विभागीय मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन
फोंडाघाट : देशात ५४३ पैकी ४०० पेक्षा जास्त खासदार हे भाजपा सह एनडीए चे असावेत हे ध्येय आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. जर पंतप्रधान मोदींवर उद्धव ठाकरे, संजय राऊत काही वाकडे बोलले तर माघारी जाऊ देणार नाही असा राणे स्टाईल इशाराही केंद्रीयमंत्री राणे यांनी दिला. कोव्हीड काळापासून आजवर देशात ८० कोटी जनतेला मोदींनी मोफत धान्य सुरू ठेवले आहे. महिला सक्षमीकरण, महिलांना रोजगार मिळावा म्हणून एम एस एम इ च्या माध्यमातून सबसिडी देऊन उद्योगी महिला बनवल्या आहेत. आज उद्योगात महिलांची संख्या ४९ टक्के आहे. २०४७ पर्यंत स्वतंत्र भारत देशाला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा जगात विकसित देश म्हणून भारताची ओळख असेल. भारताला जागतिक अर्थसत्ता बनवण्यासाठी आपण मोदींचे हात बळकट करूया. फळप्रक्रिया उद्योग असो की अन्य कोणताही स्वयंरोजगार असो, त्यात स्थानिक तरुण तरुणींना प्राधान्य मिळायला हवे. फोंडा विभागात सुमारे १३ हजार मतदार आहेत. त्यातील ९० टक्के मतदान मिळायला हवीत असे मार्गदर्शन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी फोंडाघाट विभाग महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा फोंडाघाट विभागाचा महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे संपन्न झाला. हजारहून अधिक उपस्थितीने ओव्हरफ्लो गर्दीत संपन्न झालेल्या या मेळाव्याला आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, राजन चिके, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, फोंडाघाट सरपंच सौ. संजना आग्रे, लोरे नं १ सरपंच अजय रावराणे, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, फोंडाघाट उपसरपंच तन्वी मोदी, घोणसरी उपसरपंच दीप्ती कारेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे, फोंडाघाट एजुकेशन सोसा. चेअरमन सुभाष सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती सदानंद उर्फ बबन हळदिवे, माजी सभापती सुजाता हळदिवे, शक्ती केंद्र प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, नरेश गुरव, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, नवीन कुर्ली वसाहत चे राजेंद्र कोलते, शिवसेना विभाग प्रमुख शांताराम राणेउपस्थित होते.