19.4 C
New York
Saturday, May 18, 2024

Buy now

लोरे नरामवाडी येथील तरुणांचा उबाठा सेनेला जय महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे व आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

कणकवली | मयुर ठाकूर : तालुक्यातील फोंडा येथील आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यावेळी लोरे नरामवाडी येथील राकेश मांडवकर, सिद्धेश धुमक, रमेश पाष्टे, सुजय पाष्टे, सौरभ राणे, शुभम धुमक, अजय मांडवकर, रतन धुमक यांनी उबाठा शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशामुळे शिवसेना उबाठा ला मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लोरे येथील तरुणांनी फोंडा येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यावेळी भाजप पक्षात प्रवेश केला.

यावेळी आ. नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, राजन चिके, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे, लोरे नं १ सरपंच अजय रावराणे, पियाळी सरपंच प्रवीण पन्हाळकर, कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, फोंडाघाट उपसरपंच तन्वी मोदी, घोणसरी उपसरपंच दीप्ती कारेकर, डॉ. मिलिंद कुलकर्णी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, फोंडाघाट विकास सेवा सोसायटी चेअरमन राजन नानचे, फोंडाघाट एजुकेशन सोसा. चेअरमन सुभाष सावंत, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी सभापती सदानंद उर्फ बबन हळदिवे, माजी सभापती सुजाता हळदिवे, शक्ती केंद्र प्रमुख विश्वनाथ जाधव, गजानन सावंत, नरेश गुरव, वाघेरी माजी सरपंच संतोष राणे, नवीन कुर्ली वसाहत चे राजेंद्र कोलते, शिवसेना विभाग प्रमुख शांताराम राणे उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!