शिरगाव : देवगड तालुक्यातील नाद-भोळेवाडी येथील जेष्ठ नागरिक स्मिता रघुनाथ पास्टे ( ६५) या काजूच्या बागेत काजू वेचण्यासाठी जात असताना शनिवारी दुपारी उष्माघाताने पडून त्यांचा मृत्यू झाला. त्या सायंकाळी बागेत मृतावस्थेत आढळून आल्या.त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे , सुना, नातवंडे असा परिवार आहे.