18 C
New York
Sunday, April 20, 2025

Buy now

फोंडाघाट – निपाणी मार्गावरील खड्डे न बुजविल्यास रास्तारोको !

कणकवली : फोंडाघाट-निपाणी मार्गावर अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. सदरचा रस्ता एमएसआडीसीकडे असून त्यांचे कोणतेही कार्यालय उपलब्ध नाही. त्यामुळे याबाबत दाद कुठे मागायची? सदर रस्ता तातडीने वाहतुकीला निर्धाक न केल्यास फोंडाघाट ग्रामस्थांसह कधीही रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देवगड निपाणी हा राज्यमार्ग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नकाशावर आहे. सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देखभाल दुरुस्तीसाठी ताब्यात होता. परंतु सदर रस्ता शासनाच्या नवीन धोरणानुसार, एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात येऊन सदर रस्त्यावर शासनाच्या हायब्रीड अॅम्युनिटी प्रोग्रॅम अंतर्गत सदर रस्त्यावरील नांदगांव ते फोंडाघाट दाजीपूर खिंडीपर्यंतचे निविदा काढण्यात आली. पाऊस संपला तरीही सदर रस्त्यावरील पडलेले मोठे खड्डे बुजविण्याचे काम या रस्त्यावर आजमितीपर्यंत केलेले नाही. या रस्त्यावर कायम बरेच अपघात होत आहेत. फोंडाघाट बाजारपेठ भागता ८ ते ९ ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. तसेच घाटमार्गावरील रस्त्यावर फार मोठे खड्डे आहेत. त्यामुळे रहदारीला त्या ठिकाणी अपघात होत आहेत. MSIDC जिल्ह्यात कोठेच कार्यालय नसल्याने सदर तक्रार कोणत्या कार्यालयात करण्यात यावी हा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.

कोल्हापूरकडे जाणारे गगनबावडा- भुईबावडा आंबोली हे घाट अवजड वाहनासाठी बंद असल्यामुळे या रस्त्यावरुन अवजड व हलकी वाहतूक सुरू असते. त्यामुळे सदर रस्त्यावरुन प्रवास करताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे भविष्यातील अपघात व मनुष्यहानी टाळण्यासाठी फोंडाघाट नागरिकांसह सदर रस्त्यावरील फोंडाघाट रस्त्यावर याबाबतची कोणतीही पूर्व सूचना न देता सता राको आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री. पारकर यांनी म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!