कणकवली : परप्रांतिय हॉटेल कामगार राजू (पूर्ण नाव माहित नाही) ( वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे रा.परबवाडी ) यांचे आज झोपेतच निधन झाले. याबाबतची माहिती बबलू शिवनंदन शर्मा ( रा. श्रीराम अपार्टमेंट जळकेवाडी ) यांनी पोलिसात दिली आहे.
मयत राजू हा २०२० पासून बबलू शिवानंदन शर्मा यांच्या भालचंद्र हॉटेलमध्ये आचारी म्हणून कामावर होते. राजू तसेच शिवशंकर शर्मा, रामदास, रहिदास असे तिघेजण परबवाडी येथे रहायचे. शनिवारी सकाळी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाही म्हणून याकडे बबलू शर्मा यांचे लक्ष वेधले. त्यांनीही त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही उठले नाही. म्हणून त्याना उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून पाहिले असता ते मयत झाल्याचे घोषित केले.
याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.