तुमचा हक्काचा माणूस मंत्री झालाय केव्हाही हाक द्या आम्ही आपल्यासाठी सदैव तत्पर आहोंत
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांची ग्वाही
कणकवली : हरकुळ बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर, गांगेश्वर, जैन ब्राम्हण, मंदिर परिसर सुशोभिकरण कामाचे महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. मंत्री ना. नितेश राणे यांचे बुलंद पटेल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांचेही राजू पेडणेकर यांनी स्वागत केले.
“बोलें तैसा चाले त्याची वंदावी पाऊले” या म्हणी प्रमाणे दिलेला शब्द पाळणारे मंत्री ना. नितेश राणे यांनी आपला शब्द खरा करून दाखवला, असे मत यावेळी प्रास्ताविकातून बुलंद पटेल यांनी व्यक्त केले. माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पाठपुराव्याने हे काम पूर्णत्वास गेले असेही यावेळी बुलंद पटेल यांनी सांगितले.
यावेळी मंत्री ना. नितेश राणे यांनी सर्वाना धन्यवाद दिले. तुमचा हक्काचा माणूस मंत्री आहे. तुम्ही कधीही हाक द्या मी आणि माझे सहकारी आपल्यासाठी तयार आहोत, अशी आश्वासक ग्वाही देखील मंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
यावेळी संदेश उर्फ गोट्या सावंत आपल्या मनोगतातून दिलेला शब्द आम्ही पाळतो. तुम्हीही आम्हाला साथ द्या, असे आवाहन केले. यापुढेही अशी कामे करत राहू असे आश्वासन देखील श्री. सावंत यांनी यावेळी दिले.