10 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

तरुणांचे भवितव्य घडविण्यात राणेंना अपयश : संदेश पारकर

कणकवली : गेली ३५ वर्षे सत्तेत असूनही नारायण राणे इथल्या तरूणांचे भवितव्य घडविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांचाच वारसा आता नितेश राणे चालवत असल्याने कणकवली मतदारसंघ अधोगतीकडे चालला आहे. त्यामुळे आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. येत्या २० तारखेला इथली जनता परिवर्तन घडवेल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले.

श्री. पारकर यांनी आज देवगड तालुक्यातील शिरवली, नाद, ओंबळ, गवाणे येथे प्रचार बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी राणेंच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली. श्री. पारकर म्हणाले, केंद्रीय उद्योगमंत्रीपदापर्यंत पोचलेले राणे जिल्ह्याच्या विकासाची दिशा बदलू शकले असते. पण त्यांना केवळ स्वतःचा आणि निवडक कार्यकर्त्यांचा विकास करायचा होता. त्यामुळे त्यांनी जनतेची दिशाभूल करून जिल्हा अविकसित ठेवला.

 

 

श्री. पारकर म्हणाले, सर्वसामान्य जनता गरीब रहावी. जनतेला केवळ निवडणुकीपुरतेच पैसे वाटप करून त्यांना त्या वेळेपुरते खूष ठेवावे असाच फंडा राणेंनी आजवर राबवला. नारायण राणेंचे सुपूत्र नितेश राणे हे देखील तोच कित्ता गिरवत आहेत. त्यामुळे राणे असेपर्यंत जिल्ह्यात उद्योग येण्याची अजिबात शक्यता नाही. राणेंना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे.

श्री. पारकर यांनी शिरवली गावाबरोबरच नाद, उंबळ, महाळुंगे, गवाणे या गावांतही प्रचार बैठका घेतला. यावेळी ते म्हणाले की, जो विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवलाय जे आशीर्वाद तुम्ही मला दिलेत, म्हणूनच संदेश पारकर सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता विधानसभेची निवडणूक या अपप्रवृत्तीच्या लढवतोय. तसेच सर्वसामान्यांच्या पाठबळावर आम्ही ही निवडणूक जिंकणार देखील आहोत. त्यासाठी प्रत्येक मतदाराने मशाल चिन्हावर मतदान करेल असा विश्वास आहे.

यावेळी त्यांच्यासोबत गणेश पोयरेकर, संदीप पोयरेकर, सुनील पोयरेकर, दिनेश पोयरेकर, रवींद्र पोयरेकर, जिवाजी पोयरेकर, संतोष पोयरेकर सविता पोयरेकर, पल्लवी पोयरेकर, उज्वला कोयळे, ललिता तोरस्कर, सागर बोरुले, काशिनाथ मेस्त्री, प्रकाश गोरुले, दिलीप वाडेकर, संभव गोरुले, सुहास गुरव, प्रदीप नारकर, दीपक देवरुखकर, काशिनाथ मेस्त्री, पूजा वाडेकर तसेच गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!