कणकवली : गेली ३५ वर्षे सत्तेत असूनही नारायण राणे इथल्या तरूणांचे भवितव्य घडविण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांचाच वारसा आता नितेश राणे चालवत असल्याने कणकवली मतदारसंघ अधोगतीकडे चालला आहे. त्यामुळे आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. येत्या २० तारखेला इथली जनता परिवर्तन घडवेल असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले.
श्री. पारकर यांनी आज देवगड तालुक्यातील शिरवली, नाद, ओंबळ, गवाणे येथे प्रचार बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी राणेंच्या घराणेशाहीवर जोरदार टीका केली. श्री. पारकर म्हणाले, केंद्रीय उद्योगमंत्रीपदापर्यंत पोचलेले राणे जिल्ह्याच्या विकासाची दिशा बदलू शकले असते. पण त्यांना केवळ स्वतःचा आणि निवडक कार्यकर्त्यांचा विकास करायचा होता. त्यामुळे त्यांनी जनतेची दिशाभूल करून जिल्हा अविकसित ठेवला.