24.4 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

कणकवली येथे महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे झाले उद्घाटन

महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होईल

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास

कणकवली | मयुर ठाकूर : लोकसभा निवडणूक महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले.असे आम्ही घोषित करतो.आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून लोकसभा निवडणूक जिंकायची आहे.तसा संकल्प आजच करुयात.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार यांनी पंचायत समिती निहाय व नगरपंचायत प्रभाग निहाय प्रचार बैठका,मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत.त्याप्रमने प्रत्येक ठिकाणी महायुतीची मेळावे घ्यायचे आहेत.एकत्र काम करायचे आहे.आपण सर्वांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा निवडणूक विजयाचा संकल्प करायचा आहे,असे आवाहन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

कणकवली येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालय समोर महायुतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे,माजी आम.राजन तेली,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,बँक अध्यक्ष मनीष दळवी ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश (गोट्या )सावंत,संजना सावंत, प्रकाश राणे, संदीप साटम,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,बँक संचालक विठ्ठल देसाई,संतोष कानडे,राजू परुळेकर,भूषण परुळेकर,भास्कर राणे,संदीप सावंत,संदीप मेस्त्री,मिलिंद मेस्त्री,अण्णा कोदे,प्रकाश पारकर,बाळा जठार,बंडू हर्णे ,महेश सारंग , हर्षदा वाळके, भाग्यलक्ष्मी साटम, प्राची कर्पे, मेघा गांगण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख समीर प्रभूगावकर,प्रकाश सावंत,सेना पदाधिकारी भास्कर राणे,प्रमोद मसुरकर,संदीप खानोलकर,नाना सापळे, आदींसह भाजपा व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोदी साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है..!महायुतीचा विजय असो… भारतीय जनता पार्टीचा विजय असो… ,नारायण राणे साहेब आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..!अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

भाजपा नेते ,केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले,लोकसभा निवडणूक महायुतीचा प्रचाराचा हा पहिला नारळ फुटत आहे.जो महायुतीचा उमेदवार असेल त्याचे अधिकृतपणे काम या कार्यालयातून केलं जाईल.महायुतीचा उमेदवार विजयी होईल.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!