आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट
कणकवली | मयुर ठाकूर : उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संजय राऊत ते सांगलीला असल्याचे चित्र दाखविले जात आहे.मात्र सांगलीच्या लोकसभेसाठी चद्रहार पाटलांची उमेदवारी मागे घेतो. आम्हाला 100 कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्री वरून काँग्रेस ला देण्यात आला आहे. ही माहितीच काँग्रेसच्या एका नेत्याने दिली आहे.संजय राऊत काँग्रेस ला झुकविण्यासाठी सांगलीला आहे की शभर कोटी साठी ? हे खरं आहे की खोट याची माहिती राऊत व उद्धव ठाकरेंनी द्यावी.असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केले.ते कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलत होते.
निवडणूक हाच उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे. तिकीट विक्री करून घर चालवणे हा त्यांचा धंदा आहे. संजय राऊत ने स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली होत होती आणि आज त्याने यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. फडणवीस साहेबांना कुठल्याही उपचाराची गरज नाही. उलट तुझ्या मालकाला व त्याच्या मुलाला वेडे होण्याची पाळी फडणवीस साहेबांनी आणली आहे. त्यामुळे त्याना आग्राच्या मेंटल हॉस्पिटल ला पाठवा व महाराष्ट्र कायम चा उद्धव ठाकरे मुक्त करा.अशी टीका केली.
नरेंद्र मोदी जागतिक नेते आहेत. विश्व पुरुष आहेत.मातोश्री पुरते असलेले उद्धव ठाकरे यांची तुलना त्याचे सोबत होऊ शकत नाही. ती हिम्मत संजय राऊत ने करू नये.असा सल्ला यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिला.